पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:55 PM2024-02-26T12:55:23+5:302024-02-26T12:56:21+5:30
सकल मराठा समाजाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पिंपरीत निषेध करण्यात आला...
पिंपरी : राज्य सरकारने मराठा समाजास ओबीसीमधूनच न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे, सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दाखल केलेले आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्य सरकार मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडत आहे, असा पाटील यांनी आरोप केला आहे. सकल मराठा समाजाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पिंपरीत निषेध करण्यात आला.
मनोज जारंगे पाटील आमरण उपोषण करत आंतरवाली सराटी सराटीहून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मराठा बांधव मुंबईकडे जाणार आहेत. याबाबत डॉ आंबेडकर चौक आंबेडकर पुतळा पिंपरी येथे मराठा ते कार्यकर्त्यांच्या बैठक झाली. त्यात सरकारचा निषेध केला.
बैठकीस प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, ओमकार देशमुख, नकुल भोईर, अभिषेक म्हसे, निखिल गणूचे, वसंत पाटील, सुनिता शिंदे, गिरीश कदम, मोहन जगताप, प्रकाश बाबर,चंद्रशेखर कणसे, गणेश देशमुख, स्वप्निल परांडे, श्याम पाटील, वाल्मीक माने, कल्याण पाटील, प्रदीप काटे, पांडुरंग प्रचंड राव, संपत बांगर उपस्थित होते.