School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:15 PM2022-06-15T16:15:30+5:302022-06-15T16:16:40+5:30

बहुतांश शाळांमध्ये गुलाब - पुष्प, भेटवस्तू, देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

In Pune Child girl rode a horse and entered the school in royal style | School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश

School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश

Next

पुणे :  राज्यातील अनेक शाळा १५ जून म्हणजेच आजपासून सुरु झाल्या आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांनी मुलांना शाळेत जायला मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यंमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. बहुतांश शाळांमध्ये गुलाब - पुष्प, भेटवस्तू, देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पुण्यातही शहर आणि ग्रामीण भागात असंख्य शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागात तर चक्क विद्यार्थ्यांचे बैलगाडीत बसवून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तर पुणे शहरातील मीरा शाह या मुलीने थेट घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात वाजत गाजत शाळेत प्रवेश केला आहे. 

मीरा शाह ही साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह यांची कन्या आहे. मीरा डेक्कन एजुकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कुल शाळेत शिकत आहे. या चिमुकलीला घोडयावर स्वार होताना पाहून अनेक लोकांनी तिचे कौतुक केले. पहिल्यांदा इतिहासात असे झाले आहे कि, पालकांनी कन्येला अशा उत्साहपूर्वक वातावरणात शाळेत नेले आहे.     

 महात्मा फुले यांच्या वेशभूषेत स्वागत 

कर्नल यंग प्राथमिक विद्यालय सावित्रीबाई फुले, महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा पाया रचला. आज पण सावित्रीबाई यांनी एका मुलीचे हाथ धरत शाळेत घेऊन आली. शाळेची सुरवात महात्मा फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी शाळेची घंटा वाजवत शाळेत सर्वांचे स्वागत केले. अखिल रामनगर मित्र मंडळ व नवज्योत  मित्र मंडळ, येरवडा यांनी आयोजन केले. 

फुगे हवेत उडवून जल्लोषात शाळेत प्रवेश 

नूतन मराठी विद्यालय शाळेत रंग बिरंगी टोप्या परिधान केले होते. मुलांनी फुगे बांधून जल्लोषात हवेत उडवले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रवेश उत्सव साजरा केला. 

Web Title: In Pune Child girl rode a horse and entered the school in royal style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.