पुणे जिह्यात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:29 AM2024-04-23T11:29:27+5:302024-04-23T11:30:01+5:30

आठवडे बाजारांमुळे मतदान केंद्रांना अडथळा येण्याची शक्यता असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाल्यानंतर दिवसे यांनी आदेश दिले आहेत....

In Pune district, the market will remain closed for weeks on the day of polling, the order of the district collector | पुणे जिह्यात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिह्यात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : जिल्ह्यात दोन टप्प्यांत होणाऱ्या मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. आठवडे बाजारांमुळे मतदान केंद्रांना अडथळा येण्याची शक्यता असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाल्यानंतर दिवसे यांनी आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात बारामती मतदारसंघात ७ मे रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात पुणे, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ज्या गावांमध्ये आठवडे बाजार भरतो अशा गावांच्या स्थितीबाबत जिल्हा परिषदेकडून अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात आठवडे बाजार भरणाऱ्या गावांमध्ये मतदान शाळांमध्ये होणार आहे. याचा सविस्तर अहवाल सर्व संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रावर आठवडे बाजारामुळे विपरीत परिणाम होणार नाही आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत अहवालात सुचविण्यात आले आहे.

जिल्ह्यात आठवडे बाजार भरणाऱ्या गावांची संख्या मोठी आहे, त्यामध्ये काही गावांमध्ये तर बाजारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी म्हणून मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Web Title: In Pune district, the market will remain closed for weeks on the day of polling, the order of the district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.