पुण्यात मद्यधुंद एसटीचालकाचा स्वारगेट-सांगोला ६२ किलोमीटर प्रवास सुसाट; प्रवाशांचा जीव मुठीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 07:43 PM2023-03-03T19:43:04+5:302023-03-03T19:43:14+5:30

चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केला अन् बस थांबवण्यास भाग पाडले

In Pune drunken ST driver's 62 km journey to Swargate Sangola went smoothly Passengers lives in hand | पुण्यात मद्यधुंद एसटीचालकाचा स्वारगेट-सांगोला ६२ किलोमीटर प्रवास सुसाट; प्रवाशांचा जीव मुठीत

पुण्यात मद्यधुंद एसटीचालकाचा स्वारगेट-सांगोला ६२ किलोमीटर प्रवास सुसाट; प्रवाशांचा जीव मुठीत

googlenewsNext

नीरा : मद्यपी चालकाने स्वारगेट - सांगोला बस सुसाट पळवल्याने घटना उघडकीस आली आहे. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेटपासून बस नागमोडी चालू लागली. चालकाने ६२ किलोमीटर अंतर पार केल्यावर नागरिकांना कळाले. ट्रकचा कट बसल्याने डांबरी रस्ता सोडून बस चालू लागल्याने प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर काही प्रवासी आणि वाहकाने चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले अन् सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

याबाबत मोहन इंगुळकर (रा. वेल्हा) व मंगल पाटोळे (रा. पंढरपूर) या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट - सांगोला बस (क्र. एमएच १४ बीटी ३५८४) दुपारी दीड वाजता स्वारगेट बसस्थानकातून निघाली. बसस्थानकाबाहेर येताच दुभाजकाला धडकली. पण, त्यावेळी काही जाणवले नाही. पुढील प्रवास सुरू झाला. बस वारंवार झोला मारत होती. कधी वेगात, तर कधी रेस करत बसचा प्रवास सुरू होता. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेटपासून, तर बस नागमोडी चालू लागली. एका क्षणाला तर समोरून येणाऱ्या ट्रकला कट ही बसला, त्यानंतर बसने डांबरी रस्ता सोडून थेट साईडपट्टीवरून प्रवास सुरू केला. यामुळे प्रवासी भयभीत झाले. चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर काही प्रवासी आणि वाहकाने चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले.

दरम्यान, पुणे विभागाचे लाइन चेकर सहायक वाहतूक निरीक्षक कमर शेख, वसंत रावते, रफिक आतार हे नीरा परिसरातच होते. शेख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व चालकाला ताब्यात घेत नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले. बस नीरा स्थानकात आणून प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. सांगोला आगाराची ही बस ५२ प्रवासी घेऊन निघाली होती. नियमित तपासणी करताना पालखी मार्गावर ही बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली होती. अशा अवस्थेत बस का उभी आहे हे पाहिले असता, चालक संतोष विश्वंभर वाघमारे (वय ३२, रा. लातूर आगार, सांगोला) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. सोबत वाहक प्रवीण बुरंजे (सांगोला आगार) हे होते. प्रवाशांनी चालक दारू पिऊन बस चालवत असल्याची तक्रार केल्याने चालकाला नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: In Pune drunken ST driver's 62 km journey to Swargate Sangola went smoothly Passengers lives in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.