Pune Rain: पुण्यात ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, हलक्या सरींनी बरसतोय
By श्रीकिशन काळे | Published: August 20, 2023 03:47 PM2023-08-20T15:47:57+5:302023-08-20T15:49:08+5:30
काही दिवसांपासून लख्ख उन्हाचा अनुभव पुणेकरांना येत होता
पुणे : शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून लख्ख उन्हाचा अनुभव पुणेकरांना येत होता. परंतु, शनिवारपासून ‘लगी आज सावन की फिर वो झडी है...’ असेच म्हणावे लागत आहे. रविवारची सकाळही ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींनी सुरू झाली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस झाला. पुणे शहरातही शनिवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रविवारी सकाळी भुरभुर सुरू झाली. काही तासांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. पुणे परिसरात उद्या ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच सोमवारपासून पुन्हा पाऊस सुट्टीवर जाईल, असाही अंदाज देण्यात आला आहे.
शहरातील पाऊस
शिवाजीनगर : ३.४ मिमी
पाषाण : ३.२ मिमी
लोहगाव : ३.० मिमी
लवळे : ६.० मिमी
मगरपट्टा : १.५ मिमी