पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

By राजू हिंगे | Published: May 13, 2024 01:24 PM2024-05-13T13:24:24+5:302024-05-13T13:24:51+5:30

भवानी पेठेतील या मतदार केंद्रांवर जिवंत मतदारांची नावे मृत असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत....

In Pune, living voters became dead; Type above Polling Station No. 188 in Bhawani Peth | पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

पुणे :पुणे लोकसभा मतदार संघातील भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ मध्ये जिवंत मतदारांच्या नोंदी मृत्यू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी उत्साहाने गेलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव मयत असे नोंदल्याचे आढळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. 

पुणे लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळपासून उत्साहात मतदान होत आहेत. पण अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावे गायब आहेत. मात्र भवानी पेठेतील या मतदार केंद्रांवर जिवंत मतदारांची नावे मृत असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत.

मतदान केंद्र क्र. १८८, महात्मा फुले पेठ, शाळा नंबर ९५, खोली नंबर २ येथे मतदान असलेल्या ५ जणांच्या बाबतीत मयत नोंदी आढळले. नजीर करीम शेख (मतदार क्र. ८९६), राजा मोहन गावंडे (७५८), हसन शेखलाल शेख (७७६), विजय तुकाराम कोंढरे (१११), फकीर अहमद शेख (३०४) या मतदारांच्या नावापुढे मयत अशी नोंद दिसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. युवक क्रांती दल, भारत जोडो अभियान चे  कार्यकर्ते संदिप बर्वे यांना आणि काँग्रेस च्या बुथवरील कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आला.

Web Title: In Pune, living voters became dead; Type above Polling Station No. 188 in Bhawani Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.