पुण्यात आता मॉलमध्ये तरुणींचे ड्रग्ज सेवन; पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 05:38 AM2024-06-25T05:38:08+5:302024-06-25T05:38:20+5:30

एल-३ पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक व्हिडीओ व्हायरल, पोलिस तपास सुरू 

In Pune now, young women consume drugs in malls Another video viral the next day after the pub | पुण्यात आता मॉलमध्ये तरुणींचे ड्रग्ज सेवन; पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक Video Viral

पुण्यात आता मॉलमध्ये तरुणींचे ड्रग्ज सेवन; पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक Video Viral

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील एल-३ पबमध्ये ड्रग्ज सेवन झाल्याची चर्चा असतानाच दोन युवती एका पबच्या वॉशरूममध्ये मोबाइलवर ड्रग्जच्या लाइन मारून त्याचे सेवन करीत असतानाचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला. हा व्हिडीओ पुणे-अहमदनगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमधील पबच्या वॉशरूममधला असल्याची चर्चा आहे. पोलिस तपास करीत आहेत.

काय आहे व्हिडीओत?
हॉटेलच्या वॉशरूममध्ये दोन मुली अमली पदार्थांचे सेवन मोबाइलवर ठेवून करीत असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.
एवढेच नाही तर, या व्हिडीओत व्हिडीओ काढणारी महिला त्यांना वॉशरूमधून बाहेर निघण्याची विनंती करीत आहे. मात्र, त्या विनंतीला मुली दाद देत नसल्याचेही दिसून येते. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे समजू शकले नाही.

एकूण सात आरोपींना २९ जूनपर्यंत कोठडी
- फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लेझर लाउंज (एल ३) मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणात अटकेतील सात जणांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
- पार्टीत अमली पदार्थासारखा पदार्थ देण्यात आला होता. तिघांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर इतरांची चौकशी होईल.

Web Title: In Pune now, young women consume drugs in malls Another video viral the next day after the pub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.