Pune Porsche Accident : पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:41 PM2024-05-22T15:41:02+5:302024-05-22T15:47:48+5:30
Pune Porsche Car Accident आरोपी विशाल अग्रवालला मंगळवारी संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले...
Pune Porsche accident| पुणे : पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयात आणले असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. 'वंदे मातरम..., विशाल अग्रवाल मुर्दाबाद', अशा घोषणा देत 'वंदे मातरम संघटने'तर्फे अग्रवालविरोधात निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवालला मंगळवारी संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आरोपीवर शाई पडली नाही. पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आरोपी विशाल अग्रवालवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. अपघातानंतर अवघ्या पंधरा तासांत अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला. या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसदेखील ॲक्शन मोडवर आले आहेत.
सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी -
आरोपी मुलाला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अग्रवालला सध्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सध्या न्यायालयात सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिपने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला? विशाल अगरवाल यांनी विनानंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? असे प्रश्न सरकारी वकिलांकडून विचारण्यात आले. वरील सगळ्या बाबींचा तपास करण्यासाठी सरकारी वकीलांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
#WATCH | Pune car accident case | People throw ink at the police van in which the father of the minor accused was brought to court. pic.twitter.com/spGvwhCi1Y
— ANI (@ANI) May 22, 2024