Pune Crime | शिवाजीनगरमध्ये जुन्या भांडणातून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:01 AM2023-04-24T10:01:03+5:302023-04-24T10:07:30+5:30

परस्परविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल...

In Shivajinagar two factions clash over an old feud; A conflicting case is filed pune crime | Pune Crime | शिवाजीनगरमध्ये जुन्या भांडणातून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल

Pune Crime | शिवाजीनगरमध्ये जुन्या भांडणातून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवाजीनगर येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये तिघांवर वार करून गंभीर जखमी झाले. दोन्ही गटांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांना खबरी देतो कारणावरून टोळक्याने तरुणाला स्टीलच्या बेसबॉल बॅटने मारहाण केली. त्याच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. जमीर कंबर इराणी (वय २२ )असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अबुल हसन हुमायून इराणी, कझम ऊर्फ कासीम हमायुन इराणी, कासीम बाबर इराणी, अली फिरोज इराणी, मोख्तार मोहम्मद इराणी, शब्बीर बाबर इराणी, अबुजर फिरोज इराणी, अब्बास फिरोज इराणी, हैदर मोहम्मद इराणी (सर्व रा. पाटील इस्टेट शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

मावसबहिणीकडे भांडण सोडविण्यासाठी चाललेल्या तरुणासह त्याच्या मामाला अडवून टोळक्याने बेसबॉल बॅटने मारहाण केली. लोखंडी हत्याराने त्यांच्यावर वार करून दोघांना गंभीररित्या जखमी केले. ही घटना २१ एप्रिलला सव्वा अकराच्या सुमारास संचेती चौकात घडली. मुख्तारअली मोहम्मद इराणी (वय १९) आणि अबुल इराणी अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी जमीर कंबर इराणी, शब्बीर कंबर इराणी, मेहंदीहसन कंबर इराणी, अबुतुरा इराणी, कासीम इराणी, हैदर शेख, अली इराणी, अबुजर इराणी, फिदामानू इराणी, मोहम्मद शेख (सर्व रा. पाटील इस्टेट), शिवाजीनगर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अहिवळे तपास करत आहेत.

Web Title: In Shivajinagar two factions clash over an old feud; A conflicting case is filed pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.