Rain Update: काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अजूनही कमीच! येत्या काही दिवसांमध्ये दमदार बरसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 01:09 PM2024-07-07T13:09:51+5:302024-07-07T13:10:02+5:30

जून व जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याची कसर भरून निघेल, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

In some places the of rain is still less It will rain heavily in the next few days in maharashtra | Rain Update: काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अजूनही कमीच! येत्या काही दिवसांमध्ये दमदार बरसेल

Rain Update: काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अजूनही कमीच! येत्या काही दिवसांमध्ये दमदार बरसेल

पुणे : यंदा देशभरात १०६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. जून महिना संपला असून, आतापर्यंत देशभरात २०१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात सरासरी २०४.९ मिमी पाऊस होतो. सरासरीपेक्षा १.८१ टक्के पाऊस कमी झाला असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज दिला होता. परंतु, अद्यापतरी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. काही भागामध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागात म्हणजे लातूर, बीड, परभणी, बारामती, दौंड, इंदापूर या ठिकाणी जून महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. परंतु, विदर्भातील नंदुरबार, गडचिरोली व इतर जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. तसेच मुंबई विभागातही पावसाचे प्रमाण कमी आहे.

जून व जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याची कसर भरून निघेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला हाेता. आतापर्यंत तर जून महिना संपला तरी बहुतांश भागातील पावसाची सरासरी अर्धीच आहे. आता जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. आतापर्यंत पावसाने देशातील सरासरी गाठलेली आहे. हळूहळू का होईना पावसाचे प्रमाण चांगले होऊ शकते. आता मान्सूनमध्ये ऊर्जा नसल्याने जोरदार किंवा मुसळधार पडत नव्हता. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसेल, अशी शक्यता आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे


राज्यातील शनिवारचा पाऊस

पुणे ०.८ मिमी
जळगाव : २० मिमी

कोल्हापूर : ३ मिमी
महाबळेश्वर : २६ मिमी

नाशिक : ५ मिमी
सांगली : ०.३ मिमी

सातारा : ३ मिमी
सोलापूर : १८ मिमी

मुंबई : २ मिमी
रत्नागिरी : २७ मिमी

उस्मानाबाद : ३ मिमी
छ. संभाजीनगर : १ मिमी

अकोला : ६ मिमी
बुलढाणा : १९ मिमी

Web Title: In some places the of rain is still less It will rain heavily in the next few days in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.