SSC Result: पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:08 PM2022-06-17T16:08:12+5:302022-06-17T16:08:23+5:30
पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के तर नगर जिल्ह्याचा निकाल ९६.५८ टक्के
पुणे : दहावी निकालात पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली असून, जिल्ह्याचा निकाल ९७.७४ टक्के लागला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के लागला आहे. नगर जिल्ह्याचा निकाल ९६.५८ टक्के लागला आहे. विभागाचा एकूण निकाल ९६.९६ टक्के असून, आठ हजार ८८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहेत, अशी माहिती मंडळाच्या विभागीय अध्यक्षा वंदना वाहूळ यांनी दिली.
विभागात दोन लाख ६६ हजार ४०० विद्यार्थीदहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी दोन लाख ५८ हजार ३१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ९६.९६ इतकी आहे. नेहमीप्रमाणे मुलींचे उत्तीर्णतचे प्रमाण जास्त म्हणजे ९८.१२ टक्के इतके आहे, तर ९६.०१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८०.१८ टक्के आहे. विभागात दोन लाख पाच हजार १५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ७९.४२ टक्के इतके आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार ८४७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी एक लाख २८ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ९६.७७ टक्के आहे. जिल्ह्यात चार हजार २८० अनुत्तीर्ण झाले आहेत, तर ९८.०८ टक्के मुली व ९५.६४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात ९७ हजार ५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ७६.१९ आहे.
नगर जिल्हा
जिल्ह्यातील ६८ हजार ९०१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६६ हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ९६.५८ टक्के इतका आहे. जिल्ह्यात दोन हजार ३५२ अनुत्तीर्ण झाले आहेत, तर ९७.८२ टक्के मुली तर ९५.६४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात ५३ हजार ३९७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ८०.२३ टक्के आहे.
सोलापूर जिल्हा
जिल्ह्यातील ६४ हजार ६५२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६३ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ९७.७४ टक्के आहे. जिल्ह्यात एक हजार ४५६ अनुत्तीर्ण झाले आहेत. तर ९८.५१ टक्के मुली तर ९६.०१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यात ५३ हजार ८०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ८५.१३ टक्के आहे.