नोव्हेंबर महिन्यात पुणे रेल्वे विभागात ३७ हजार फुकट्यांकडून केला करोडोंचा दंड वसूल

By नितीश गोवंडे | Published: December 6, 2023 01:46 PM2023-12-06T13:46:20+5:302023-12-06T13:46:49+5:30

सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २५० प्रवाशांकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

In the month of November Pune Railway Department collected a fine of crores from 37 thousand free passers | नोव्हेंबर महिन्यात पुणे रेल्वे विभागात ३७ हजार फुकट्यांकडून केला करोडोंचा दंड वसूल

नोव्हेंबर महिन्यात पुणे रेल्वे विभागात ३७ हजार फुकट्यांकडून केला करोडोंचा दंड वसूल

पुणे : पुणेरेल्वे विभागात नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान २८ हजार ३०१ फुकटे विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ९ हजार ३८६ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ५८ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २५० प्रवाशांकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याद्वारे एकूण ३ कोटी ३ लाख ३५ हजार ८२४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, पुणे विभागातील आजवरच्या इतिहासातील हे सर्वाधिक उत्पन्न असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. याआधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक २.८० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे  यांचे नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू असून, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले.

Web Title: In the month of November Pune Railway Department collected a fine of crores from 37 thousand free passers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.