Pune | पुण्यातील निर्भया प्रकरणात ॲड. झंजाड विशेष सरकारी वकील

By नम्रता फडणीस | Published: May 2, 2023 09:35 PM2023-05-02T21:35:38+5:302023-05-02T21:40:02+5:30

महत्त्वपूर्ण खटल्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वकील हेमंत झंजाड यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे...

In the Nirbhaya case in Pune Adv. Zanjad Special Public Prosecutor pune crime news | Pune | पुण्यातील निर्भया प्रकरणात ॲड. झंजाड विशेष सरकारी वकील

Pune | पुण्यातील निर्भया प्रकरणात ॲड. झंजाड विशेष सरकारी वकील

googlenewsNext

पुणे : राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर ४२ वार करून तिचा गळा चाकूने चिरून खून करण्यात आला होता. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या घटनेने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. विधानसभेतही या विषयाची चर्चा झाली. अशा महत्त्वपूर्ण खटल्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वकील हेमंत झंजाड यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

पुण्यातील बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे १२ ऑक्टोबर २०२१ रोजी तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर यश लॉन्स येथे इतर खेळाडूंसोबत कबड्डीचा सराव करत असताना आरोपी शुभम भागवत वय २२ याने धारदार शस्त्राने तिचा खून केला होता. खूनप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या चुलत बहिणीने बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.

वकील हेमंत झंजाड हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली व्यवसाय करत असून याआधीही त्यांनी पुणे शहर व जिल्ह्यात गाजलेले सांगवीतील तुषार ढोरे खून प्रकरण, दौंड येथील पोलिस संजय शिंदेकडून करण्यात आलेले दुहेरी खून प्रकरण, पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरण, लोणावळ्यातील पोलिस अतुल साठे यांच्या खुनाच्या प्रयत्नाचे प्रकरण, चतु:शिंगीतील राष्ट्रीय टेनिस खेळाडूच्या खुनाचा प्रयत्न प्रकरण, मुळशीचे तत्कालीन तहसीलदारांचे लाचखोरी प्रकरण, राजगुरूनगर सहकारी बँक घोटाळा प्रकरण, धायरी येथील सुनेवरील जादूटोणा प्रकरण, अशा अनेक महत्त्वपूर्ण केसेसचे कामकाज पाहिले आहे.

Web Title: In the Nirbhaya case in Pune Adv. Zanjad Special Public Prosecutor pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.