राज्यात १८ वर्षांखालील ३६ लाख पूरूषांना उच्च रक्तदाब, ४ लाख जणांना मधुमेह

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: January 22, 2024 04:18 PM2024-01-22T16:18:01+5:302024-01-22T16:24:31+5:30

राज्यात अडीच काेटी पुरूषांची तपाासणी झाली असून त्यापैकी ३२.६६ लाख जणांना वेगवेगळया आजारांसाठी वैदयकीय उपचार देण्यात आले

In the state, 3.6 lakh males below 18 years of age have high blood pressure, 4 lakh have diabetes | राज्यात १८ वर्षांखालील ३६ लाख पूरूषांना उच्च रक्तदाब, ४ लाख जणांना मधुमेह

राज्यात १८ वर्षांखालील ३६ लाख पूरूषांना उच्च रक्तदाब, ४ लाख जणांना मधुमेह

पुणे : राज्यात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निराेगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील पुरूषांची आराेग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे आतापर्यंत राज्यात अडीच काेटी पुरूषांची तपासणी करण्यात आली असून त्याद्वारे ३६ लाख पूरूषांना उच्च रक्तदाब, ४ लाख जणांना मधुमेह आढळून आला आहे. यामुळे, राज्य उच्चरक्तदाबाची राजधानी हाेउ पाहतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य आराेग्य विभागाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निराेगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभियान राज्याच्या आराेग्य विभागाने सूरू केले असून ते यावर्षी मार्च महिन्याअखेर सूरू राहणार आहे. या अभियानाद्वारे राज्यातील १८ वर्षावरील ४ काेटी ६७ लाख पुरूषांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहीती देताना आराेग्य खात्यातील एक वरिष्ट अधिकारी म्हणाले की, राज्यात अडीच काेटी पुरूषांची तपाासणी झाली असून त्यापैकी ३२.६६ लाख जणांना वेगवेगळया आजारांसाठी वैदयकीय उपचार देण्यात आले आहेत. तर २७ हजार ९७४ जण छाेटया-माेठया शस्त्रक्रियांना सामाेरे गेले.

काय आहे अभियान?

या अभियानाद्वारे अठरा वर्षावरील प्रत्येक पुरूषाची असंसर्गजन्य आजरांबाबत तपासणी करण्याचे ध्येय आहे. यामध्ये रक्तदाब, बीएमआय, लठठपणा साेबत गरज पडल्यास चाचण्या जसे इसीजी, सीटीस्कॅन, एक्सरे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना शस्त्रक्रियांची गरज पडेल त्यांना महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून उपचार देण्यात येणार आहेत.

येथे हाेणार तपासणी

आराेग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आराेग्य केंद्र व सामुदायिक आराेग्य केंद्र, हिंदुह्रदयसम्राट आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अशा विविध स्तरावरील आराेग्य संस्थांमध्ये ही तपासणी केली जात आहे.

पुणे विभागात ९ लाख जणांना उच्च रक्तदाब

या अभियानाअंतर्गत पुणे विभागात ९ लाख जणांना रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच, ७५ हजार ५०० जणांना मधुमेहाचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

राज्यात काेणत्या आजाराचे किती रुग्ण आढळले?

उच्च रक्तदाब - ३६ लाख
डायबिटीस - ४.४५ लाख
ह्रदयराेगाचे विकार - १.७८ लाख
ताेंडाचा कॅन्सर - ७३

Web Title: In the state, 3.6 lakh males below 18 years of age have high blood pressure, 4 lakh have diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.