लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यासमोरून ४ लाखांची राेकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:32 PM2024-04-23T12:32:10+5:302024-04-23T12:33:21+5:30
स्थिर सर्वेक्षण पथकाने साेमवारी (दि. २२) दुपारी शनिवार वाड्यासमाेर त्याची राेख रक्कम जप्त केली.....
पुणे : लाेकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राेख रक्कम जवळ बाळगण्यास निर्बंध आहेत. असे असतानाही एक व्यक्ती ३ लाख ८० हजार रुपये घेऊन जात हाेता. याची माहिती मिळताच स्थिर सर्वेक्षण पथकाने साेमवारी (दि. २२) दुपारी शनिवार वाड्यासमाेर त्याची राेख रक्कम जप्त केली.
या राेख रकमेबाबत योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली.