पुण्यातील नाना पेठेत झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक समर्थ पोलीस स्टेशनला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:37 PM2022-07-28T18:37:46+5:302022-07-28T18:37:58+5:30

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी

In the wake of the murders in Nana Peth in Pune hundreds of citizens entered the Samarth Police Station | पुण्यातील नाना पेठेत झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक समर्थ पोलीस स्टेशनला दाखल

पुण्यातील नाना पेठेत झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक समर्थ पोलीस स्टेशनला दाखल

googlenewsNext

पुणे : पुण्याच्या नानापेठेत अक्षय वल्लाळ या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. अवघ्या 30 सेकंदात या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार करण्यात आले. नाना पेठेतील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. या खूनामागे मुंबईतील गँगचे कनेक्शन असण्याची शक्यता अशा परिस्थितीत नागरिक भीतीच्या छायेत आहेत. या दहशतीतून मुक्तता करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

अक्षय आणि आरोपी नाना पेठ परिसरातील नवावाडा परिसरात राहतात.  अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर होता. समाजात त्याची चांगली ओळख होती. यामुळेच आरोपी त्याच्यावर चिडून होते. याच कारणावरून त्यांचे यापूर्वी देखील भांडण झाले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला केला. अवघ्या 30 सेकंदात आरोपींनी त्याच्यावर 35 वार केले. इतकेच नाही तर तो निश्चित पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समर्थ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.

Web Title: In the wake of the murders in Nana Peth in Pune hundreds of citizens entered the Samarth Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.