देहूरोडमध्ये रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी बेमुदत धरणे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 06:26 PM2018-04-25T18:26:51+5:302018-04-25T18:26:51+5:30

माणसाच्या आयुष्याशी निगडित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्यात यासाठी फुले शाहू आंबेडकर मंचाने बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Inadequate movement for paused work start in Dehuroad | देहूरोडमध्ये रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी बेमुदत धरणे आंदोलन 

देहूरोडमध्ये रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी बेमुदत धरणे आंदोलन 

Next
ठळक मुद्देझोपडपट्टी भागातील धोकादायक तारांचे निर्माण झालेले जाळे काढण्याकडे दुर्लक्ष

देहूरोड  : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व महावितरण कंपनीच्या अखत्यारतीत येणारी विविध कामे रखडली आहे.  ती सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, यामागणीसाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने विकासनगर ते देहूरोड रस्त्यावर बेमुदत धरणे आंदोलनाला बुधवारी (दि.२५ ) रोजी दुपारी सुरुवात करण्यात आली आहे . 
 फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, देहूरोड येथील लोहमार्गाच्या बाजूने रस्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शितळानगर, शिवाजीनगर बंदिस्त गटारे, शौचालयांची व्यवस्था,सर्व वॉर्डात एलईडी दिवे बसविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन यांसारख्या कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात आली पाहिजे, यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
   या आंदोलनात फुले शाहू आंबेडकर मंचाचे मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, विजय मोरे,देवराव डोके, शिवराम अहिरे, मिलिंद कसबे , लक्ष्मण कांबळे , रेणू रेड्डी, आनंद धिलोड आदीं कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. महावितरणने भूमिगत वाहिन्यासह विविध कामे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गरज नसतानाही झोपडपट्टी भागातील धोकादायक तारांचे निर्माण झालेले जाळे काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे मुद्दे आंदोलन कर्त्यांनी उपस्थित केले आहे.

Web Title: Inadequate movement for paused work start in Dehuroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.