एमआयटीत स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:09+5:302021-02-06T04:17:09+5:30

विद्यापीठात स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि आशय मेजरमेंटस् आणि आयईईई, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठात ...

Inauguration of Automated Weather Station at MIT | एमआयटीत स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन

एमआयटीत स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन

Next

विद्यापीठात स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि आशय मेजरमेंटस् आणि आयईईई, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन पाणी पंचायतचे विश्वस्त विक्रम साळंखे, डॉ. जयराम खिलारी, आयईईईचे जगदीश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या हवामान केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी हवामानाची अचूक माहिती देण्यात येणार आहे. तापमान, आद्रता, पावसाचे प्रमाण आणि हवामानासंबंधी संपूर्ण माहिती प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन आणि लागवड करण्यासाठी मदत होणार असल्याचे विक्रम साळुंखे यांनी सांगितले.

एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि केईएम हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५० पेक्षा अधिक बाटल्या संकलित करण्यात आल्या.

याचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, जी आय सी प्रॅक्टिस लीडर हायब्रीस आयबीएमचे उमेश कौल, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Automated Weather Station at MIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.