श्वास कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:23+5:302021-06-05T04:09:23+5:30

पुणे : जे. पी. त्रिवेदी ट्रस्ट आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्यावतीने घोले रस्त्यावर श्वास कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन ...

Inauguration of breathing covid and isolation center | श्वास कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन

श्वास कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन

Next

पुणे : जे. पी. त्रिवेदी ट्रस्ट आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्यावतीने घोले रस्त्यावर श्वास कोविड आणि विलगीकरण केंद्राचे उद्घाटन रोटरी क्लब पुणे जिल्ह्याच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. सत्तर बेडची क्षमता असलेल्या या उपचार केंद्रामध्ये सध्या २० ऑक्सिजन बेड व विलगीकरण कक्षात १० बेड उपलब्ध असून, शासनाने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा कमी दारात या केंद्रामध्ये उपचार मिळू शकतील, असे रोटरीतर्फे कळविण्यात आले आहे.

या उद्घाटनप्रसंगी सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष, तसेच कोविड उपचार केंद्राच्या प्रकल्पाचे सुदिन आपटे व पराग मुळ्ये उपस्थित होते. पुण्यातील २४ रोटरी क्लब मिळून जिल्हास्तरीय रोटरी क्लबच्या आर्थिक सहाय्याने या केंद्राची उभारणी केली असून, हे केंद्र सर्वांसाठी खुले असणार आहे. पालिकेकडून संमती मिळूनही ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेमुळे श्वास केंद्राच्या उद्घाटनास विलंब झाला असला तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

------------------------------------------

Web Title: Inauguration of breathing covid and isolation center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.