कोरोना जनजागृतीसाठी कारवान व्हॅनचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:29+5:302021-07-11T04:08:29+5:30
सेव्ह द चिल्ड्रन- बाल रक्षा भारत या संस्थेने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लहान मुले व माता यांच्यासोबत हँडवॉश प्रकल्प राबविला ...
सेव्ह द चिल्ड्रन- बाल रक्षा भारत या संस्थेने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लहान मुले व माता यांच्यासोबत हँडवॉश प्रकल्प राबविला आहे. ज्यातून साबणाने हात धुण्याचे फायदे आणि कोरोना व इतर संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी साबणाने हात धुण्याचे महत्त्व सांगितले जात आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे 'कारवान व्हॅन' हा कोरोना जनजागृतीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे.
दौंड तालुक्यात यवत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात ‘कारवान व्हॅन’ हा कोरोना जनजागृतीपर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वरिष्ठ व्यवस्थापक ईपशिता दास, सहव्यवस्थापक हरीश वैद्य, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सभापती हेमलता फडके, सदस्या निशा नीलेश शेंडगे, नितीन दोरगे, सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, गणेश शेळके, विजय काटम, सुनीता काटम, उत्तम गायकवाड, बाळासाहेब नवले, मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन चांगदेव लवांडे यांनी केले.
‘कारवान' व्हॅनचा दौंड पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके यांनी झेंडा फडकावून उद्घाटन केले. यावेळी गणेश कदम, निशा शेंडगे, नितीन दोरगे, सरपंच समीर दोरगे, सुभाष यादव, ईपशिता दास, हरीश वैद्य, सुनीता काटम आदी मान्यवर.