कदमवाकवस्तीमध्ये कोरोना लसीकरण उपकेंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:48+5:302021-07-24T04:07:48+5:30
गौरी गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला ...
गौरी गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. तरी, नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भातील कोणतीही प्रकारची भीती न बाळगता कोरोना लसीकरणाला पुढे यावे. कदमवाकवस्ती गावाची लोकसंख्या ही ६० हजारांपेक्षा जास्त आहे. यामुळे नागरिकांचे कोरोनाचे लसीकरण वेगाने सुरू व्हावे. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून स्वतंत्र कोरोना लसीकरणाचे उपकेंद्र सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कूलमधील उपकेंद्रात २०० नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यासाठी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. रूपाली भंगाळे, अनु देवकर आणि केदार सिस्टर यांचे सहकार्य मिळाले.
या वेळी भाजपा कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच बाबाराजे काळभोर, ग्रामपंचायत सदस्य सचिन दाभाडे, रूपाली कोरे, माधुरी काळभोर, अविनाश बदडे, ग्रामविकास अधिकारी बी. आर. कांबळे उपस्थित होते.
२३कदमवाकवस्ती