पारगाव येथे डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:56+5:302021-05-26T04:11:56+5:30

पारगाव येथील मंगलमूर्ती डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार राहुल कुल ...

Inauguration of Dedicated Covid Care Center at Pargaon | पारगाव येथे डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

पारगाव येथे डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

Next

पारगाव येथील मंगलमूर्ती डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाले.

या वेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, डॉक्टर सुमंत शितोळे व डॉक्टर शीतल शितोळे यांनी अतिशय कमी वेळामध्ये दौंड तालुक्‍यातील सर्वाधिक अद्ययावत कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर, आयसीयूसह सर्व सुविधा उपलब्ध केले आहेत. डॉक्टर सुमंत शितोळे म्हणाले की, या कोविड केअर सेंटरमध्ये ६ व्हेंटिलेटर,१२ आय.सी.यू.बेड,६० विलगीकरण कक्ष बेड उभारण्यात आले आहेत. एखाद्या कोरोना पेशंटला हृदयविकाराचा झटका किंवा पॅरलिसेसचा झटका आल्यास त्वरित सुविधा देणारे हे तालुक्यातील एकमेव हॉस्पिटल आहे. पेशंटला माफक दरामध्ये सुविधा दिल्या जातील.

उपस्थितांचे स्वागत डॉक्टर सुमंत शितोळे व डॉक्टर शीतल शितोळे यांनी केले. या कोविड केअर सेंटरला जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात,तुषार थोरात, जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके ,वैशाली नागवडे , दिलीप हंडाळ यांनी भेट दिली. आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, महेश पासलकर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, नामदेव ताकवणे, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार,सर्जेराव जेधे ,हरिभाऊ शेलार, रमेश बोत्रे, सुभाष शेलार, विजय काळे, डॉक्टर शीतल शितोळे,डॉक्टर रुपनवर ,डॉक्टर रणदिवे,डॉक्टर जामले, बाळकृष्ण भोसले ,महादेव ताकवणे ,महेश शेळके, रामेश्वर वेताळ ,राहुल टिळेकर ,तुकाराम ताकवणे, समीर बोत्रे, अजित शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

पारगाव येथे येथे मंगलमूर्ती डेडिकेटेड केअर सेंटरचे उद्घाटन करताना आमदार राहुल कुल, डॉक्टर सुमंत शितोळे, डॉक्टर शीतल शितोळे व मान्यवर.

Web Title: Inauguration of Dedicated Covid Care Center at Pargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.