देऊळगाव गाडा येथे डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:08+5:302021-05-13T04:11:08+5:30
या वेळी माजी आमदार रंजना कुल, भाजपा जिल्हाध्यक्ष कांचन कुल, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपा तालुका अध्यक्ष माऊली ...
या वेळी माजी आमदार रंजना कुल, भाजपा जिल्हाध्यक्ष कांचन कुल, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपा तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, संचालक विकास शेलार, अशोक दिवेकर, डॉ. संदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर'ला राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. आमदार राहुल कुल यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार राहुल कुल हे ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आहे. सर्वसामान्य जनतेला या सेंटरचा निश्चित फायदा होईल.
आमदार राहुल कुल यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या 'डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर' द्वारे १०० ऑक्सिजन बेड्स तसेच 'कोविड केअर सेंटर'द्वारे विलगीकरणासाठी सुमारे २०० बेड्स उपलब्ध आहेत.
राहुल कुल की ,सुसज्ज हॉस्पिटलच्या धर्तीवर चोवीस तास वैद्यकीय सुविधा, वॉर्ड बॉय, नर्सेस, ऑक्सिजन लाईन्स, फोल्डेबल बेड्स, महिला व पुरुषांसाठी विभक्त विलगीकरण कक्ष, प्रत्येक बेड्ससाठी आवश्यक टेबल्स, वैद्यकीय उपकरणे, इतर साधने, घोषणा प्रणाली, प्रोजेक्ट्रर्स, ऍम्ब्युलन्स, जनरेटर, सिक्युरिटी, औषधांसाठी स्वतंत्र कक्ष, इन हाऊस क्लीनिंग टीम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत व या ठिकाणी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णाचे संपूर्ण उपचार, औषधे, जेवण आदी सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. आमदार विकास निधीचा वापर करून उपजिल्हा रुग्णालयांतर्गत 'डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर' व 'कोविड केअर सेंटर'चा विस्तार करण्याचा हा विशेष उपक्रम राबविला आहे.
१३ केडगाव देऊळगावगाडा