शिवाजी विद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:00+5:302021-08-19T04:15:00+5:30

यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष संजय वाडेकर, जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान जनरल सेक्रेटरी तथा प्राचार्य सुभाष गारगोटे, अमित मुखोपाध्याय, ...

Inauguration of Digital Classroom at Shivaji Vidyalaya | शिवाजी विद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

शिवाजी विद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

Next

यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष संजय वाडेकर, जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान जनरल सेक्रेटरी तथा प्राचार्य सुभाष गारगोटे, अमित मुखोपाध्याय, विनम्र नारखेडे, माजी प्राचार्य अरुण देशमुख, सेक्रेटरी अनिल ठुबे, संचालक रामदास खाटमोडे, माजी पर्यवेक्षक शंकरराव बर्वे उपस्थित होते.

श्री शिवाजी विद्यामंदिर व सि. भी. पाटोळे कनिष्ठ महाविद्यालयात सुसज्ज गणित प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम व स्टुडिओ तसेच प्रशालेची वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. किरण मांजरे म्हणाले, शिक्षकांना विद्यार्थ्यांप्रती प्रामाणिक राहून गुणवत्तावाढ, भौतिक सुविधांची निर्मिती, अध्ययन अध्यापनात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर तसेच आपल्या संस्थेशी एकनिष्ठ राहून आपण घेतलेला वसा वारसा प्रामाणिकपणे पुढे न्यावा. प्रास्ताविक अनिल ठुबे, सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे, आभार उपप्राचार्य बाळासाहेब खामकर यांनी केले.

१८ चाकण

180821\screenshot_20210818-102043_whatsapp.jpg

चाकणला श्री शिवाजी विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांना पूरक साधनांचे उद्घाटन करताना. 

Web Title: Inauguration of Digital Classroom at Shivaji Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.