केसनंद पोलीस स्टेशनचे उद्घाटन, गुंडगिरी, दादागिरी याचा बंदोबस्त करूच : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:47+5:302021-08-18T04:15:47+5:30

सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे सरपंच नितीन गावडे, उपसरपंच रुपाली हरगुडे, माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे, ...

Inauguration of Kesnand Police Station, Gundgiri, Dadagiri: Deshmukh | केसनंद पोलीस स्टेशनचे उद्घाटन, गुंडगिरी, दादागिरी याचा बंदोबस्त करूच : देशमुख

केसनंद पोलीस स्टेशनचे उद्घाटन, गुंडगिरी, दादागिरी याचा बंदोबस्त करूच : देशमुख

Next

सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे

सरपंच नितीन गावडे, उपसरपंच रुपाली हरगुडे, माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे, उद्योजक अमर घोरपडे, प्रकाश जाधव, तानाजी हरगुडे, पोलीस पाटील पंडित हरगुडे, राजेंद्र सावंत, तानाजी हरगुडे, शंकर वाबळे, वाल्मीक हरगुडे, रहीमभाई शेख, सुरेश हरगुडे

आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख म्हणाले, “नवीन निर्माण झालेल्या पोलीस चौकीमुळे केसनंद परिसरातील महिला, विद्यार्थिनी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहतील. गुंडगिरी, दादागिरी याचा बंदोबस्त करूच, पण नागरिकांना भयमुक्त वातावरण निश्चित राहील.

येथे नियुक्त असणारे पोलीस कर्मचारी येथेच नागरिकांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील.

माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे म्हणाले की, नवीन निर्माण झालेल्या पोलीस स्टेशनसाठी स्वतःच्या मालकीची स्वतंत्र जागा इमारत नाही. तरी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. पोलीस चौकी झाल्याने सुरक्षतेची नागरिकांना हमी मिळेल.

सरपंच नितीन गावडे म्हणाले की,

ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे पोलीस चौकीकरिता पूर्ण सहकार्य राहील. पोलीस निरीक्षक सुहास पाटील व किरण वराळ यांच्या कडे येथील पोलीस चौकीची जबाबदारी देण्यात आली.

प्रास्ताविक उपनिरीक्षक सुरेश गोरे यांनी केले. तर राजेश तटकरे यांनी आभार मानले.

केसनंद (ता.हवेली) येथे पोलीस स्टेशन उद्घाटन पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच नितीन गावडे, उपसरपंच रुपाली हरगुडे आणि इतर मान्यवर.

छाया के. डी. गव्हाणे

Web Title: Inauguration of Kesnand Police Station, Gundgiri, Dadagiri: Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.