नीरा येथे महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:52+5:302021-08-22T04:12:52+5:30
नीरा येथे असलेल्या विविध महिला बचत गटांचा ग्रामसंघ बनवण्यात आला आहे. या बचत गटांना कार्यालयीन कामकाजासाठी इमारतीची गरज होती. ...
नीरा येथे असलेल्या विविध महिला बचत गटांचा ग्रामसंघ बनवण्यात आला आहे. या बचत गटांना कार्यालयीन कामकाजासाठी इमारतीची गरज होती. नीरा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभाग क्र. १ मध्ये पाणीपुरवठा पंपहाऊस शेजारी एक इमारत त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये गुरुवारपासून महिला ग्रामासंघाच्या कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या वेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने, ग्रामसेवक मनोज डेरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगेश ढमाळ, ज्युबिलंट फाउंडेशनचे अजय ढगे, ग्रामपंचायत सदस्या राधा माने, वैशाली काळे, सारिका काकडे, माधुरी वाडेकर व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना वर्धिनी सुनिता भादेकर म्हणाल्या की, या कार्यालयाचा बचत गटांच्या महिलांना कार्यालयीन कामासाठी चांगला उपयोग होणार आहे. कर्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी भिसे यांनी केले, तर आभार संगीता जगताप यांनी मानले.