दीक्षार्थी मनीष गोडसे परिवाराचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:21 AM2021-02-05T05:21:20+5:302021-02-05T05:21:20+5:30

पुणे : ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि जय महावीर व जय जिनेंद्रचा जयकार अशा आध्यात्मिक वातावरणात पुण्यातील मनीष भगवान गोडसे, ...

Inauguration Manish Godse family felicitated | दीक्षार्थी मनीष गोडसे परिवाराचा सत्कार

दीक्षार्थी मनीष गोडसे परिवाराचा सत्कार

Next

पुणे : ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि जय महावीर व जय जिनेंद्रचा जयकार अशा आध्यात्मिक वातावरणात पुण्यातील मनीष भगवान गोडसे, सपना मनीष गोडसे त्यांचा मुलगा भाविक, मुलगी मानसी यांचे स्वारगेट येथील दादावाडी अहिंसा भवन येथे आगमन झाले. गोडसे परिवारातील चार जणांच्या दीक्षा समारोहानिमित्त या वेळी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

जर्मन डेनर्फास कंपनीतील लाखो रुपयांची नोकरी सोडून पुण्यातील मनीष गोडसे आणि त्यांच्यासोबत पत्नी सपना गोडसे व भाविक आणि मानसी यांनी जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

२२ फेब्रुवारी रोजी पालिताना येथील शत्रुंजय महातीर्थ येथे प. पू. आचार्य रवीशेखर सूरिश्वरजी म.सा.यांच्या हस्ते दीक्षा समारोह होणार आहे. यानिमित्त स्वारगेट येथील दादावाडी अहिंसा भवन येथे रविवारी (दि. २४) सकाळी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या वेळी दादा वाड़ी ट्रस्ट व पुणे गौशाला पांजरापोल तर्फे गोडसे परिवाराचा तिलक, माला, फेटा, साल, मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. मनीष भगवान गोडसे परिवार यांनी साध्वीजी रत्नरेखाश्रीजी महाराज यांच्या संपर्कात आल्यानंतर संसाराचा त्याग करून अधात्मासाठी आपले जीवन समर्पण करण्याचा निर्णय घेतला.

मनीष गोडसे यांच्या हस्ते दादावाडी अहिंसा भवन येथील कर्मचा-यांना वर्षीदान (भेट वस्तू) दिल्या. मनीष गोडसे म्हणाले की, आईवडिलांचे समर्थन आणि सविताबाई छाजेड यांनी जैनधर्माची शिकवण दिल्यामुळे मी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तसेच साध्वीजी रत्नरेखाश्रीजी म.सा. यांच्या संपर्कात आल्यानंतर अधात्मासाठी आपले जीवन समर्पण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रस्टचे चेअरमन भवरलाल जैन यांनी सर्वांचे स्वागत केले. ओम ओसवाल यांनी दीक्षाचे महत्व सांगितले, तर संपत जैन यांनी सूत्रसंचालन केले. गणपत मेहता, सतीश शाह, श्री जय जिनेंद्र सेवा संघाचे विमल संघवी, अशोक हिंगड, श्री जैन युवक संघटनेचे भद्रेश बाफना, सुरेश सेठिया, अरिहंत जागृती मंच, जैन सोशल ग्रुप, सिद्धाचल महिला मंडळ, बालाजीनगर जैन संघ, नवकार महिला मंडळ आणि जिनकुशल महिला मंडळासह अन्य संघटना व दादावाडी ट्रस्ट तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो : स्वारगेट येथील दादावाडी अहिंसा भवन येथे गोडसे परिवारातील चार जणांच्या दीक्षा समारोहानिमित्त सत्कार करण्यात आला.

Web Title: Inauguration Manish Godse family felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.