'फायसर्व्ह'च्या पहिल्या STEM लॅबोरेटरीचे पुण्यात उद्घाटन; ४ हजारांपेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:57 PM2023-12-19T17:57:28+5:302023-12-19T17:58:07+5:30

श्री संत तुकाराम विद्यालय, लोहेगाव येथे झाले पहिल्या STEM लॅबोरेटरीचे लोकार्पण

Inauguration of first STEM Laboratory in Pune as More than 4 thousand underprivileged students will get benefits | 'फायसर्व्ह'च्या पहिल्या STEM लॅबोरेटरीचे पुण्यात उद्घाटन; ४ हजारांपेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

'फायसर्व्ह'च्या पहिल्या STEM लॅबोरेटरीचे पुण्यात उद्घाटन; ४ हजारांपेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

पुणे: आर्थिक सेवा टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स आणि पेमेंट्स मध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या फायसर्व्ह या कंपनीने पुणे आणि पुण्याच्या आसपास आठ सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण प्रदान करण्यासाठी आपल्या सायन्स टेक्नॉलॉजी इंजीनीअरिंग आणि मॅथेमेटिक्स (STEM) लॅबोरेटरी प्रोग्रामचे उद्घाटन केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक खात्याचे या प्रकल्पास समर्थन आहे आणि तो राबवण्याची कामगिरी एक्स्परिफनने फायसर्व्हच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी पार्टनर युनिटेड वे, मुंबई मार्फत केली.

६९ लक्ष रु पेक्षा जास्त गुंतवणुकीसह, प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांमधील 4000 पेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना STEM शिक्षणाचे लाभ देण्याचा फायसर्व्हचा इरादा आहे. या उपक्रमाचा फोकस किफायतशीर, अभ्यासक्रमावर आधारित STEM लॅबोरेटरीजची रचना आणि विकास यावर आणि त्याद्वारे संकल्पनेची कल्पना करणे, शोध प्रक्रिया, प्रयोगशीलता आणि शिकण्या-शिकवण्याच्या संपूर्ण नावीन्यपूर्ण पद्धती दाखल करण्यावर आहे. या लॅबोरेटरीच्या मदतीसाठी पहिल्या वर्षासाठी ई-लर्निंग इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (ICT) मोबाइल अॅप्लिकेशन ‘ट्यूटर सपोर्ट’ असेल तसेच क्वालिटी कंट्रोलसाठी प्रोग्राम मॅनेजमेंट वजा इम्पॅक्ट असेसमेंट टूल असेल.

चेन्नई, बंगळूर आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) येथील सरकारी शाळांमध्ये या प्रकल्पाची सुरुवात केल्यानंतर फायसर्व्हने आता पुण्यातील 8 सरकारी शाळांना डिलिव्हरी करून यशस्वीरित्या आपला विस्तार वाढवला आहे. या प्रकल्पामुळे सदर लॅबोरेटरीजच्या जीवनकाळात 4 शहरांतील 34 सरकारी शाळांमधील सुमारे 17000 विद्यार्थ्यांपर्यंत STEM शिक्षण पोहोचले आहे.
 
फायसर्व्हचे अध्यक्ष, ग्लोबल सर्व्हिसेस, श्रीनी क्रिश म्हणाले, “आपण जेथे राहतो आणि काम करतो, तेथे आपल्या समुदायांना सशक्त बनवणे हे सर्वसमावेशक विकासासाठी अटळ आहे. देशभरात STEM शिक्षणाचा प्रचार करण्याच्या आमच्या उपक्रमाद्वारे आम्ही वंचित शाळांमधील तरुण मुलांपर्यंत प्रायोगिक शिक्षण पोहोचवू शकू अशी आम्हाला आशा वाटते. राष्ट्रीय टॅलेंट पूलच्या पायाभरणीसाठी हे आमचे योगदान आहे आणि आम्ही शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समाजाची परतफेड करत राहू.”
 
फायसर्व्ह गिव्ह्ज बॅक हा या कंपनीचा ग्लोबल कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम आहे, ज्याचा उद्देश आपण ज्या समुदायात राहतो आणि काम करतो, त्या समुदायांसाठी चार महत्त्वाच्या क्षेत्रांत एक सकारात्मक अनुभव तयार करणे हा आहे. ही चार मुख्य फोकस क्षेत्रे आहेत – शिक्षणाचा प्रचार, पर्यावरणीय व्यवस्थापन, समावेशकता आणि आरोग्य व कल्याण.

या उपक्रमात समाविष्ट असलेल्या शाळा पुढील प्रमाणे आहेत:-

  1. श्री संत तुकाराम विद्यालय, लोहेगाव, पुणे
  2. शिवराज विद्या मंदिर वडगांव शेरी, पुणे
  3. श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, चंदन नगर, पुणे
  4. कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालय, पुणे
  5. बालसिद्धनाथ विद्यालय, बेलसर, पुरंदर, पुणे
  6. यशवंत विद्यालय मावडी के. पी. भागशाळा, पांडेश्वर, पुरंदर, पुणे
  7. मावडी पिंपरी हायस्कूल, पिंपरी, पुरंदर, पुणे
  8. शंकरराव कोलते विद्यालय, पिसर्वे, पुरंदर, पुणे

Web Title: Inauguration of first STEM Laboratory in Pune as More than 4 thousand underprivileged students will get benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे