भादलवाडी येथे वीज उपकेंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:59+5:302021-09-15T04:13:59+5:30
कुंभारगाव बंडगर वाडी डाळज नं १ डाळज नं २ भादलवाडी या गावातील जवळपास १५००८ ग्राहकांना भिगवण उपकेंद्र तसेच काळेवाडी ...
कुंभारगाव बंडगर वाडी डाळज नं १ डाळज नं २ भादलवाडी या गावातील जवळपास १५००८ ग्राहकांना भिगवण उपकेंद्र तसेच काळेवाडी उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होत होता पण येथील शेतकऱ्यांना वीजपुरवठाबद्दल अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. खंडित व कमी दाबाने वीजपुरवठा तसेच ट्रान्सफर जळणे याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता खासदार सुप्रिया सुळे व दत्ता मामा भरणे यांनी पाच कोटी १५ लाख रुपयाचे उपकेंद्र भादलवाडी येथे मंजूर केले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की कोराेनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून त्यांनी मोठ्या जिद्दीने पिके जोमात आणले आहे. शेतकरी वीज बिल भरतील पण ते एकदम न घेता टप्प्या-टप्प्याने देतील.
याप्रसंगी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोणत्याही ठिकाणच्या पथदिवे पाणीपुरवठा व शेतकऱ्यांची वीजपुरवठा खंडित करू नये, अशा सूचना महावितरण अधिकाऱ्यांना केल्या. महाविकास आघाडी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व शेतकरी व इंदापूर तालुका हा आम्हाला कुटुंब प्रमाणे असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
140921\screenshot_20210914-160243.jpg
भादलवाडी येथील उपकेंद्राचे उद्घाटन करताना मान्यवर