किवळे येथे रयत बाजाराचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:54+5:302021-02-25T04:10:54+5:30
कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे संयुक्त विद्यमाने माननीय मुख्यमंत्री यांचे संकल्पनेतून विकेल ते पिकेल या ...
कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे संयुक्त विद्यमाने माननीय मुख्यमंत्री यांचे संकल्पनेतून विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त सीएसआर फंडमधून थेट विक्री करणाऱ्यागटांना या अभियानांतर्गत छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी सांगितले की शेतात तयार होणारा शेतमाल शेतकऱ्यांनी स्वतः ब्रँडिंग करून विक्री व्यवस्था उभारावी व जमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने गटामार्फत जास्त पिके घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे आवाहन केले. यावेळी जनार्धन भेगडे यांचे ज्वारी पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी बाळासाहेब साळुंखे, मारुती म्हसे, किरण साळुंखे, संदीप शिवले, पांडुरंग वाळके इत्यादी शेतकरी उपस्थित होते. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत व कृषी विभागाचे दत्तात्रेय घोरपडे, प्रवीण शिंदे, ज्योती राक्षे, मोहिनी अकोलकर, शीलावती झगडे, जालिंदर मांजरे, विशाल जगताप, प्रदीप ढोरे, बाबासाहेब कराळे उपस्थित होते.