गंगापूर खुर्द येथील साकव पुलाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:44+5:302021-06-01T04:08:44+5:30
याप्रसंगी हभप पांडुरंग महाराज येवले, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख ...
याप्रसंगी हभप पांडुरंग महाराज येवले, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, सागर काजळे, राजाभाऊ काळे, महेश ढमढेरे, निखिल येवले, नित्यानंद येवले, विश्वास लोहोट, सरपंच रोहिणी मधे, संतोष सावंत, राजेंद्र गाडेकर, प्रविण कोकणे, राजेंद्र कोकणे उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सावंतवस्ती येथे ६० ते ७० घरांना दैनंदिन वापरासाठी गंगापूर खुर्द येथील पुलावरून जावे लागत होते. गंगापुर खुर्द येवलेवस्ती ते सावंतवस्ती जाण्यासाठी एक साकव पुल व्हावा याची मागणी ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे केली होती. पुणे जिल्हा नियोजन समितीमधून २५ लाख २७ हजार रूपयांचा साकव पूल मंजूर केला व पूर्णही झाला. या साकव पुलाचे उद्घाटन शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
३१ घोडेगाव
गंगापूर खुर्द (ता. आंबेगाव) येथील साकव पुलाचे उद्घाटन करताना शिवाजीराव आढळराव पाटील.