एससीईआरटीच्या ब्रीज कोर्सचे सोमवारी उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:27+5:302021-06-27T04:09:27+5:30
शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम शिकवण्यापूर्वी त्यांची मागील अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाच्या घटकांची उजळणी घेतली ...
शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम शिकवण्यापूर्वी त्यांची मागील अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाच्या घटकांची उजळणी घेतली जाणार आहे. एसीईआरटीने याबाबतचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी आणि एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांना आधीच्या इयत्तेतील कोणता अभ्यासक्रम शिकवणे आवश्यक आहे. कोणत्या पाठांची उजळणी प्रामुख्याने घ्यावी लागेल. शिक्षकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करावे, पालकांनी पाठ्यपुस्तकावरील कोणत्या घटकांची उजळणी मुलांकडून करून घ्यावी, ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना अभ्यासक्रम कितपत कळला याची चाचपणी पालकांनी कशी करावी, याबाबतचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्याबाबत शिक्षकांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
-------------