गुरुनाथ पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:00+5:302021-07-17T04:10:00+5:30
कमी कालावधीत नावारूपाला आलेल्या गुरुनाथ पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते जांबूत येथे करण्यात आला ...
कमी कालावधीत नावारूपाला आलेल्या गुरुनाथ पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते जांबूत येथे करण्यात आला आहे. या वेळी जांबुतच्या सरपंच जयश्रीताई जगताप,पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर,माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव आण्णा जोरी, चोंभुतचे सरपंच दत्तात्रय म्हस्के,माजी सरपंच बाबासाहेब फिरोदिया, बाजार समितीचे संचालक सतीश कोळपे , संचालक विठ्ठल निचीत, बाबाजी निचीत , संपतराव पानमंद, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब बदर, जांबुत विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस कापसे, रावडेवाडीचे माजी सरपंच गोविंद नरवडे आदी उपस्थित होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ राउत यांनी संस्था विकासाची माहिती देताना सांगितले की
पतसंस्थेच्या ठेवी ७ कोटी २७ लाख, भागभांडवल निधी १ कोटी ५ लाख, ऑडिट वर्ग 'अ' , संस्थेचे कर्ज वाटप ५ कोटी ३० लाख व गुंतवणूक २ कोटी ८० लाख अशी आर्थिक उलाढाल असून आर.टी.जी.एस., एन. एफ. टी., मिनी ए.टी.एम., मोबाईल मेसेज, कोर बँकिंग, दररोज सोनेतारण कर्ज, महिला बचत गटांना कर्ज, लघुउद्योगांना कर्ज, तारण कर्ज, वाहन तारण कर्ज आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त आणि प्रशिक्षित कर्मचारी असल्याने चांगली सेवा दिली जाते.
मोतीबिंदू शिबिर, गुणवंत पाल्यांचा सन्मान, गरजूंना कपडे वाटप असे सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात अशी माहिती मुख्य व्यवस्थापक राजेंद्र उंडे यांनी दिली
सूत्रसंचालन ज्ञानेश्वर निचित यांनी केले तर आभार लहू गाजरे यांनी मानले.
--
फोटो क्रमांक : १६ गुरुनाथ पतसंस्था
फोटो : जांबुत ता. शिरूर येथे गुरुनाथ पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.