विद्यापीठाच्या ‘युट्यूब चॅनेल’चे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:29+5:302021-03-10T04:13:29+5:30

पुणे : नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंतच्या अनेक शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य विषयात तयार केलेले राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारप्राप्त माहितीपट पाहण्याची ...

Inauguration of the University's 'YouTube Channel' | विद्यापीठाच्या ‘युट्यूब चॅनेल’चे उद्घाटन

विद्यापीठाच्या ‘युट्यूब चॅनेल’चे उद्घाटन

googlenewsNext

पुणे : नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंतच्या अनेक शैक्षणिक, सामाजिक तसेच अन्य विषयात तयार केलेले राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारप्राप्त माहितीपट पाहण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणए विद्यापीठाच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होणार आहे. मंगळवारी विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राच्या (ईएमआरसी) वतीने ‘द हेरिटेज ऑफ टेलिव्हिजन एज्युकेशन’ या युट्यूब चॅनेलचे उद्घाटन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ईमआरसीचे संचालक डॉ. समीर सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत या चॅनेलचे उद्घाटन झाले.यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शैक्षणिक संवाद संघाचे संचालक प्रा. डॉ. जगत भूषण नड्डा हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी डॉ. करमळकर यांनी शुक्रवारी दाखवल्या जाणा-या महितीपटाचा प्रोमो रिलिज केला.

ईएमआरसीने १९८५ पासून या विभागाकडून विविध विषयांमध्ये ई-साहित्य तयार केले आहे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या जतन केलेल्या महितीपटांचे आपण डिजिटल माध्यमात रूपांतर करून दर आठवड्याला एक अश्या स्वरूपात त्याचे प्रसारण चॅनेलच्या माध्यमातून करणार आहोत. याचे छोटे प्रोमो तयार करण्यात आले आहेत. संबंधित महितीपटाचा प्रोमो प्रत्येक मंगळवारी तर पूर्ण माहितीपट शुक्रवारी प्रसारित करण्यात येणार आहे. असे नऊशेहून अधिक व्हिडीओ ईएमआरसीकडे असून त्यातील सुमारे शंभरहून अधिक माहितीपटांना राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त आहेत.

--

ईएमआरसी सारख्या संस्था या विद्यापीठाचा ‘यूएसपी’ आहे. मागील ३० वषार्पासूनचे सगळे काम या अनोख्या प्रयोगामुळे समोर येणार आहे. हा जतन केलेला संशोधनपर माहितीपटांचा वारसा या निमित्ताने लोकांना पाहायला मिळेल.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Inauguration of the University's 'YouTube Channel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.