आंबळे येथील ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:45+5:302021-09-15T04:13:45+5:30

आंबळे येथील ग्रामपंचायत ,विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन व १ कोटी ९० लाखांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ...

Inauguration of Village Secretariat at Amble | आंबळे येथील ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

आंबळे येथील ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

Next

आंबळे येथील ग्रामपंचायत ,विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन व १ कोटी ९० लाखांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या वेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की, विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी येत असतो. मात्र स्थानिकांनी कामाकडे लक्ष दिले पाहिजे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला जागेवरच थांबवले पाहिजे.

आंबळे ग्रामस्थानी ग्रामपंचायत व सहकारी संस्थेसाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी कार्यालये बांधली. या नूतन कार्यालयांचे उद्घाटन, विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. या वेळी नूतन इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याप्रसंगी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवींद्र काळे, सरपंच सोमनाथ बेंद्रे, उपसरपंच पूनम बेंद्रे, सहकारी संस्थेचे चेअरमन सुरेश बेंद्रे , व्हाईसचेअरमन दादाभाऊ संकपाळ, संतोष बेंद्रे, मुख्याध्यापक यशवंत बेंद्रे, विलास बेंद्रे, वसंत बेंद्रे, उल्हास जांभळे, दीपक वीर, गणेश रोडे, राजू गायकवाड, रमेश बेंद्रे, गोरख बेंद्रे, राजेंद्र बेंद्रे, नरसिंग बेंद्रे, हर्षदा संकपाळ, अशोक घुंबरे, विजयराज बेंद्रे, प्रकाश बेंद्रे, नितीन बेंन्द्रे, वसंत काळे, आबा घुंबरे , शरद निंबाळकर, बाप्पू शिवले यांसह मोठ्या प्रमाणावर मान्यवर व ग्रामस्थ होते.

प्रास्ताविक दीपक बेंद्रे, सूत्रसंचालन प्रवीण दौंडकर, तर अशोक बेंद्रे यांनी आभार मानले.

आंबळे ( ता. शिरूर ) येथे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन करताना मान्यवर.

Web Title: Inauguration of Village Secretariat at Amble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.