वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 05:23 AM2018-04-18T05:23:54+5:302018-04-18T05:23:54+5:30
जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या दरम्यान हजेरी लावली. या वेळी वारेही वेगाने वाहत होते.
पुणे : जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या दरम्यान हजेरी लावली. या वेळी वारेही वेगाने वाहत होते.
बारामती, इंदापूर, जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव, भोर या तालुक्यांत अवकाळीने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
त्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत; तसेच शेतामध्ये काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पिंपरीत हलक्या सरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड व मावळ, मुळशी परिसरात मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. चिंचवड, निगडी,
वाकड, आकुर्डी, थेगराव, प्राधिकरण, देहूरोड, तळेगाव, वडगाव परिसरात पाऊस पडला.
गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मंगळवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती.