संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; पुण्याला महिनाभर पुरेल एवढे पाणी १ दिवसात जमा

By राजू हिंगे | Published: July 14, 2024 05:13 PM2024-07-14T17:13:39+5:302024-07-14T17:14:04+5:30

खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन ३.५० टीएमसी झाला होता

Incessant rains increase the water storage of the khadakwasala project dam Accumulate enough water for Pune for a month in 1 day | संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; पुण्याला महिनाभर पुरेल एवढे पाणी १ दिवसात जमा

संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; पुण्याला महिनाभर पुरेल एवढे पाणी १ दिवसात जमा

पुणे: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या २४ तासात १.४५ टिएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुण्याला महिनाभर पुरेल एवढे आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा १०.१२ टिएमसी झाला आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन ३.५० टीएमसी झाला होता. विशेष म्हणजे २ जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पात ४.५५ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी येऊ लागल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती. ७ जुलैरोजी खडकवासला धरण प्रकल्पाचा पाणीसाठा ६.५० टीएमसी झाला होता. त्यानंतर पावसाचे प्रमााण कमी झाले होते. मात्र शुक्रवारपासुन पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासुन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाउस पडत आहे. शनिवारी सांयकाळी ५ वाजेपर्यत खडकवासला प्रकल्पात ८.६७ टीएमसी पाणीसाठा होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाउस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठया वाढ झाली आहे. रविवारी सांयकाळी ५ वाजेपर्यत खडकवासला प्रकल्पात १०.१२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत या प्रकल्पातील पाणीसाठा १.४५ टिएमसीने वाढला आहे. या प्रकल्पातील १०.१२ पाणीसाठा शहराला साडेसात महिने पुरेल एवढा आहे.

गेल्यावर्षीपेक्षा १.४५ टिएमसी पाणीसाठा जास्त

खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा गेल्यावर्षी या तारखेला ८.३४ टिएमसी होता. यंदा मात्र या तारखेला म्हणजे १४ जुलै रोजी या प्रकल्पातील पाणीसाठा १०.१२ टीएमसी झाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा या प्रकल्पात १.४५ टिएमसी पाणीसाठा जास्त आहे.

धरण                    आजचा पाउस            उपलब्ध साठा

खडकवासला            ११ मि.मी                १ .१९ टीएमसी
पानशेत                    १८ मि.मी               ४. ४३ टीएमसी
वरसगाव                  १८ मि.मी                ३.५८ टीएमसी
टेमघर                     ३५ मि.मी                ०.९१ टीएमसी

Web Title: Incessant rains increase the water storage of the khadakwasala project dam Accumulate enough water for Pune for a month in 1 day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.