शहरात घरफोडीच्या घटना वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:58+5:302021-06-19T04:07:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी ताडीवाला रस्ता, न-हे आणि बिबवेवाडीतील ...

The incidence of burglary has increased in the city | शहरात घरफोडीच्या घटना वाढीस

शहरात घरफोडीच्या घटना वाढीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी ताडीवाला रस्ता, न-हे आणि बिबवेवाडीतील बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ८ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी बंडगार्डन, सिंहगड आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून २ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १० ते १६ जूनदरम्यान ताडीवाला रस्त्यावरील पिनॅकल इमारतीत घडली. याप्रकरणी अनुप जोगदंड (वय ३३) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुस-या घटनेत चोरट्यांनी न-हेतील चाकणकर कॉर्नर इमारतीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून १ लाख १६ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १३ जूनला घडली असून, सागर ढमे (वय ३०) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोटारीच्या सर्व्हिस सेंटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, होम थिएटर, गाडीचा गिअर बॉक्स असा मिळून ४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १६ जूनला बिबवेवाडीतील आॅटो लाउंज फोर व्हिलर सर्व्हिस सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी हार्दिक मेहता (वय ३६, रा. महर्षीनगर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे तपास करीत आहेत.

--------------------------------

Web Title: The incidence of burglary has increased in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.