भोर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:59+5:302021-05-19T04:09:59+5:30

यामुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. सुरक्षित अंतर, मास्क लावणे या कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. यामुळे ...

The incidence of corona increased day by day in Bhor city | भोर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

भोर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

Next

यामुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. सुरक्षित अंतर, मास्क लावणे या कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. यामुळे भोर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची खरी गरज आहे.

भोर तालुक्यात एकूण कोरोनाबाधित ५ हजार २४९ रुग्ण होते. पैकी ४४८० जण उपचारानंतर घरी सोडले आहे. सध्या शासकीय व खाजगी दवाखान्यातील १० कोविड सेंटरमध्ये ६५९ रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत ११० जणांचा मृत्यू झालेला आहे. भोर शहरात १५ रुग्ण असून ग्रामीण भागातील १६ गावांत ३४ रुग्ण आहेत. शहरात दररोज ५ ते १२ पर्यत रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. तालुक्यात २५ गावे प्रतिबंधित होती. ग्रामीण भागातील १५ ते २५ गावांत दररोज ५० ते ७० जण कोरोना पाॅझिटिव्ह येत आहेत. मात्र तरीही नागरिक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. शहरातील वाईन शॉपची व देशी दारूची दुकाने बंद आहेत. मात्र चोरुन विक्री सुरु असल्याने आळ्यांत व गल्ल्यांत देशी विदेशी हातभट्टी दारूची राजरोसपणे विक्री सुरु आहे. पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

दरम्यान, १३ मे रोजी लॉकाडाऊन उठल्यापासून शहरातील किराणा, कापड, खते, बियाणे, खाद्यपदार्थ, फळे, भाजीपाला

औषधे या दुकानात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे.

याशिवाय बँकातही ग्रामीण भागातील लोकांनी रांगा लावल्या आहेत. सदरच्या रांगा रस्त्यावर आल्या आहेत. अनेक कोरोना नियमांचे पालन होत नाही. खरेदीच्या वेळी दुकानात खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर पाळले जात नाही. मास्कचा वापर होताना दिसत नाही. सदर ग्राहकांना दुकानदारांकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना केल्या जात नाही. गर्दीमुळे शहरात दररोज वाहतूककोंडी होत आहे. याकडे नगरपलिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

एकंदरीत भोर शहरात विविध प्रकारच्या खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भोर शहरात कोरोनाचा आकडा कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक दिसत आहे. यामुळे भोर प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची खरी गरज आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देण्याची खरी गरज आहे.

भोर शहरात दररोज सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. या वेळी कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही, याकडे प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

प्रमोद कुलकर्णी व सचिन देशमुख (सामाजिक कार्यकर्ते),

भोर शहरात मुख्य बाजारपेठेत लोकांची एकच गर्दी. फोटो

Web Title: The incidence of corona increased day by day in Bhor city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.