चाकणमध्ये मन सुन्न करणारी घटना! मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:50 AM2024-06-12T11:50:42+5:302024-06-12T11:52:19+5:30

घराच्या छतावर मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी धावली असताना आईलाही शॉक लागला

incident in Chakan The child was shocked and the mother rushed to help Unfortunate death of both | चाकणमध्ये मन सुन्न करणारी घटना! मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

चाकणमध्ये मन सुन्न करणारी घटना! मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

चाकण: विजेचा शॉक लागून आई- आणि मुलाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकणमधील खराबवाडी येथे घडली. मुलाला विजेचा शॉक लागल्याने आई मदतीला धावली अन् हा अनर्थ घडला.या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाकण जवळील खराबवाडी येथे घराच्या छतावर वीजेचा शॉक लागुन मायलेकाची जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली.पल्लवी जाजु असे आईचे नाव आहे, तर समर्थ जाजु (वय, १५वर्षे ) असे मृत मुलाचे नाव आहे. घराच्या छतावर आईसोबत १५ वर्षीय मुलगा समर्थ छतावर आला होता. यावेळी बाजुला असणाऱ्या पत्र्यामध्ये विद्युत लाईट प्रवाह उतरला. या पत्र्याच्या संपर्कात आल्याने मुलाला शॉक लागला. मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी धावली असताना आईलाही शॉक लागला. यामध्ये १५ वर्षीय मुलासह आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: incident in Chakan The child was shocked and the mother rushed to help Unfortunate death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.