कोरोना काळातही वाढले ‘मालमत्ता’ विभागाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:30+5:302021-04-08T04:12:30+5:30

पुणे : कोरोना काळात पालिकेचे उत्पन्न घटले आहे. मात्र, काही विभाग या अडचणीच्या काळातही आर्थिक गाडा सावरण्याचा प्रयत्न करीत ...

The income of the ‘property’ department also increased during the Corona period | कोरोना काळातही वाढले ‘मालमत्ता’ विभागाचे उत्पन्न

कोरोना काळातही वाढले ‘मालमत्ता’ विभागाचे उत्पन्न

Next

पुणे : कोरोना काळात पालिकेचे उत्पन्न घटले आहे. मात्र, काही विभाग या अडचणीच्या काळातही आर्थिक गाडा सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिळकत कर विभागापाठोपाठ पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने कोरोना काळातही उत्पन्नवाढीची कामगिरी केली आहे. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ‘भाडे वसुली’साठी राबविलेल्या विशेष मोहिमेचा सकारात्मक परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेत ‘तिप्पट’ उत्पन्न मिळविले आहे.

पालिकेच्या बांधलेल्या तसेच मोकळ्या मिळकती भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. यामध्ये अगदी व्यावसायिक गाळ्यांपासून ‘आर सेव्हन’ आणि ‘एसआरए’ योजनेतून मिळालेल्या निवासी गाळ्यांचा आणि सदनिकांचा समावेश आहे. कोरोना काळात पालिकेची क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मैदाने जवळपास वर्षभर पडून होती. त्यातच लॉकडाऊन लागल्याने या उत्पन्नालाही खीळ बसला होता. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने व्यावसायिक आणि निवासी गाळ्यांच्या थकबाकी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रीत केले होते.

थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. करारनाम्यांची पडताळणी करण्यासोबतच नव्याने करार करण्यात आले. थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली. यामुळे मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुल झाली. तर अनेक थकबाकीदारांच्या मिळकतीही ताब्यात घेण्यात आल्या.

----

सदनिकांच्या भाडेवसुलीसाठी दोन भरारी पथके नेमली होती. पीएमपीएमएल, शासकीय कार्यालयांकडूनही थकित भाड्याची वसुली करण्यात आली. संक्रमण शिबिरांसाठी भाड्याने दिलेल्या सदनिकांचे थकित भाडे व वाजवी भाडेदरानुसार भाडे वसूल केले आहे. भाडेकराराने दिलेल्या सर्व मिळकतींची कागदपत्रे स्कॅन आणि डिजिटायझेशन करण्यात आले आहे. मिळकतींच्या अद्ययावत नोंदणीसाठी नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात येत असून रोखीसोबतच ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची प्रणाली तयार करण्यात येत आहे.

- राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग

------

आर्थिक वर्ष मिळालेले उत्पन्न

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ ५० कोटी १३ लाख रुपये

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० १५ कोटी ७६ लाख रुपये

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ २२ कोटी १० लाख रुपये

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ १६ कोटी ६९ लाख रुपये

एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ १८ कोटी ८९ लाख रुपये

Web Title: The income of the ‘property’ department also increased during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.