तळेगाव येथील अपघातात आयकर विभागाच्या निरीक्षकाचा मृत्यू, उप संचालकासह दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 10:39 AM2017-11-23T10:39:14+5:302017-11-23T11:49:02+5:30

आयकरसंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या पथकाच्या वाहनाला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एका निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून उपसंचालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात तळेगाव जवळ घडला.

Income tax department officer dies in an accident in Talegaon, an inspector dies and two injured with sub-operator | तळेगाव येथील अपघातात आयकर विभागाच्या निरीक्षकाचा मृत्यू, उप संचालकासह दोन जण जखमी

तळेगाव येथील अपघातात आयकर विभागाच्या निरीक्षकाचा मृत्यू, उप संचालकासह दोन जण जखमी

Next


पुणे- आयकरसंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या पथकाच्या वाहनाला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात आयकर विभागाच्या निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून उपसंचालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात तळेगाव जवळ घडला.

अभिषेक त्यागी असं या अपघातात मृत्यू झालेल्या आयकर निरीक्षकाचं नाव आहे. या अपघातात आयकर उपसंचालक आनंद उपाध्याय, आयकर अधिकारी के के मिश्रा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हिंजवडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निरीक्षक त्यागी हे मार्च 2017 मध्ये पुणे येथे रुजू झाले होते.हे सर्व जण बुधवारी प्राप्तिकर सर्वेक्षणासाठी तळेगाव व आसपासच्या परिसरात गेलेले होते. तेथील काम संपवून परत येत असताना गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास त्यांच्या मोटारीच्या चालकाला झोप लागली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही मोटार दुभाजकाला धडकली. वेग अधिक असल्याने ही मोटार डाव्या बाजूने जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकून आत घुसली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Income tax department officer dies in an accident in Talegaon, an inspector dies and two injured with sub-operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात