Aniruddha Deshpande | सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर Income Tax विभागाची धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:52 IST2023-02-15T14:48:56+5:302023-02-15T14:52:11+5:30
एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत...

Aniruddha Deshpande | सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर Income Tax विभागाची धाड
पुणे : पुण्यात आयकर विभागाने आज मोठी कारवाई केली आहे. सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कम्युनिकेशन अर्थात, बीबीसी या वृत्तसंस्थेवर पडलेल्या छाप्यांमुळं देशभरात चर्चा सुरू असतानाच आज आयकर विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली. सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत.
देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे अधिकारी इथं झाडाझडती घेत आहेत.
शरद पवारांचे निकटवर्तीय-
सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे जवळचे मानले जातात. आयकर विभागाने आज सकाळपासून अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले आहेत.
सिटी ग्रुपचे सर्वेसर्वा-
सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एका आघाडीचा समूह आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी सिटी ग्रुपची स्थापना केली असून ते या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुण्यात सिटी ग्रुपचे अनेक व्यावसायिक व रहिवासी प्रकल्प साकारले आहेत.