आगामी निवडणुकीत प्राप्तीकर विभागाचीही राहणार करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:15 PM2019-03-11T20:15:06+5:302019-03-11T20:15:59+5:30
मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल...
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशांचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तीकर विभागाने सतर्क रहावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तीकर विभागाने तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला दक्षतेचे आदेश दिले असून, या घटना रोखण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणूक काळात अशा प्रकारे कोणी वर्तन करताना आढळल्यास, नागरिकांनी प्राप्तीकर विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी चोवीस तास निरीक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी १८००२३३०७०० अथवा १८००२३३०७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ७४९८९७७८९८ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राप्तीकर विभागाने केले आहे. मतदारांना प्रलोभने दाखविताना आढळल्यास संबंधितांवर प्राप्तीकर कायद्यांतर्गत कडक कारवाईचा इशारा, प्राप्तीकर विभागाने दिला आहे