मिळकत कराची सुविधा ‘आपल्या दारी’

By admin | Published: April 26, 2015 01:14 AM2015-04-26T01:14:44+5:302015-04-26T01:14:44+5:30

राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर महापालिकेकडून ‘मिळकत कर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

Income Tax Facility | मिळकत कराची सुविधा ‘आपल्या दारी’

मिळकत कराची सुविधा ‘आपल्या दारी’

Next

पुणे : राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर महापालिकेकडून ‘मिळकत कर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहरातील दोनशेहून अधिक घरे असलेल्या मोठ्या सोसायट्यांमध्ये महापालिकेचे पथक जाऊन कराच्या रकमेचे धनादेश नागरिकांकडून स्वीकारणार आहे. येत्या १ मेपासून हा नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार असून ३१ मेपर्यंत असणार आहे.
या आर्थिक वर्षात राज्यशासनाकडून एलबीटी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असून त्याचा फटका शहरातील विकासकामांना बसणार आहे. त्यामुळे एलबीटी खालोखाल महापालिकेस सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या मिळकत कराच्या वसुलीकडे प्रशासनाने आपला मोर्चा वळविला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून पहिल्यांदाच पोस्टाच्या माध्यमातून बिलांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ८० टक्के बिलांचे यशस्वी वाटप झाले असून पहिल्याच महिन्यात महापालिकेस तब्बल १५० कोटींचा विक्रमी उत्पन्नाचा टप्पा ओलांडता येणार आहे.
धनादेशच स्वीकारणार
उपक्रमाअंतर्गत महापालिकेकडून सोसायटीस्तरावर संकलित करण्यात येणार मिळकत कराची रक्कम
केवळ धनादेशाद्वारेच स्वीकारली जाणार आहे. (प्रतिनिधी)

असा असेल उपक्रम
महापालिकेकडून ३१ मेपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना ५ ते १० टक्क्यांपर्यंतची कर सवलत देण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांनी एप्रिल ते मे या पहिल्या दोन महिन्यांतच जास्तीत जास्त कर भरावा, या उद्देशाने मिळकत कर आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २०० हून अधिक मिळकती असलेल्या सोसायट्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक सोसायटीत त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार, करसंकलन विभागाची मोबाईल व्हॅन जाईल. त्यात महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यासह पालिकेने नेमून दिलेल्या नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी असतील. हे पथक नागरिकांकडून धनादेशाद्वारे कराची रक्कम स्वीकारतील आणि त्यांना त्याच ठिकाणी कर जमा केल्याची पावतीही देतील. त्यासाठी करसंकलन विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: Income Tax Facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.