मिळकतकरधारकांना मिळणार ५० कोटींची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:45+5:302021-02-20T04:26:45+5:30

पुणे : कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळातही मिळकतकरातून मिळालेल्या उत्पन्नाची कोरोना प्रतिबंधाच्या लढाईत मोठी मदत झाली आहे. दरम्यान, ऑक्टोबर ते ...

Income tax payers will get Rs 50 crore relief | मिळकतकरधारकांना मिळणार ५० कोटींची सवलत

मिळकतकरधारकांना मिळणार ५० कोटींची सवलत

googlenewsNext

पुणे :

कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळातही मिळकतकरातून मिळालेल्या उत्पन्नाची कोरोना प्रतिबंधाच्या लढाईत मोठी मदत झाली आहे. दरम्यान, ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविण्यात आली. ही योजनेला मंजुरी देतानाच प्रामाणिक करदात्यांना आगामी आर्थिक वर्षात सर्वसाधारण करामध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू आज सर्वसाधारण सभेमध्ये शासनाचे कर वगळता महापालिकेच्या सर्व म्हणजे १० उपकरांवर १५ टक्के सवलत सरसकट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सवलत साधारण ५० कोटी रुपये असेल.

-हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती पुणे महापालिका

------

महापालिकेने आपल्या दहा मिळकत करात पुणेकरांना सवलत दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडील चार करात सवलत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत. यामुळे प्रामाणिकपणे कर भरणा-यांना आणखी दिलासा मिळेल.

गणेश बिडकर, सभागृह नेते

-------

पुणेकरांना सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आहेच. याचबरोबर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील मिळकत कराची वसुली करण्यासाठी संबंधित विभागाला अतिरीक्त मनुष्यबळ देण्याची आवश्यकता आहे. त्यावर कार्यवाही झाली तर उत्पन्नात आणखी भर पडेल.-

दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या

-------

महापालिकेच्या हद्दीत असलेल्या आणि मिळकत कर लागू न झालेल्या पाच लाख मिळकती आहे. त्यांना मिळकतकराच्या कक्षेत आणले पाहिजे. त्याचप्रमाणे आयटीसारख्या इतर काही उद्योग क्षेत्रांना दिलेल्या मिळकतकराच्या सवलतीचा पुनर्विचार केला पाहिजे.

आबा बागुल, कॉंग्रेस गटनेते

--------

महापालिकेने प्रामाणिक मिळकतदारांना योग्य न्याय दिला आहे. मिळकत कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग असला, तरी इतर पर्यायी मार्गाचा विचार भविष्यात करावा लागणार आहे.

पृथ्वीराज सुतार, शिवसेना गटनेते.

------

महापालिकेच्या हद्दीत येवलेवाडी या गावाचा समावेश होऊन काही वर्षे लोटली आहे. अद्याप या गावाचा विकास आराखडा अद्याप मंजूर झाला नसल्याने तेथे एफएसआय, टीडीआरचा वापर करता येत नाही अशा अनेक मुद्द्यांचा विचार केला पाहिजे.

वसंत मोरे, मनसे गटनेते

Web Title: Income tax payers will get Rs 50 crore relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.