देशाच्या वाटचालीत काँग्रेसचे अतूलनीय योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:41+5:302020-12-29T04:10:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव जोशी यांच्या हस्ते काँग्रेसभवनमध्ये ध्वजारोहण करून शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचा १३५ वर्धापनदिन ...

The incomparable contribution of the Congress in the running of the country | देशाच्या वाटचालीत काँग्रेसचे अतूलनीय योगदान

देशाच्या वाटचालीत काँग्रेसचे अतूलनीय योगदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव जोशी यांच्या हस्ते काँग्रेसभवनमध्ये ध्वजारोहण करून शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचा १३५ वर्धापनदिन साजरा करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह पक्षाचे सर्व आजीमाजी पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

वय वर्षे ९८ असलेल्या जोशी यांनी पक्षाने आठवण ठेवून ही संधी दिली याबद्दल आनंद व्यक्त केला. माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तर काँग्रेसचे योगदान आहेच, पण नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याला आकार देण्याचे कामही काँग्रेसने केले. देशाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की, कोणालाही काँग्रेसचा इतिहास पुसता येणार नाही व नाकारताही येणार नाही. पुण्यातील काँग्रेस भवनालाही मोठा इतिहास आहे. अनेकांच्या त्यागातून ही इमारत उभी राहिली. महात्मा गांधी यांचा आशिर्वाद या इमारतीला मिळाला आहे. नगरसेवक अजित दरेकर यांनी काँग्रेस भवनच्या इतिसाला उजाळा दिला.

पवार यांच्या हस्ते पुणे शहर काँग्रेस व काँग्रेस भवनच्या इतिहास पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, रोहित टिळक, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, गटनेते आबा बागुल, अरविंद शिंदे, दत्ता बहिरट, अंजनी निम्हण, अनिल सोंडकर, लता राजगुरू, मनीष आनंद, वैशाली मराठे आदी यावेळी उपस्थित होते. नगरसेवक अविनाश बागवे यांनी आभार मानले.

Web Title: The incomparable contribution of the Congress in the running of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.