संपामुळे शेतकऱ्यांची गैरसोय
By admin | Published: November 18, 2016 05:54 AM2016-11-18T05:54:50+5:302016-11-18T05:54:50+5:30
तालुक्यातील ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील
दौंड : तालुक्यातील ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांवर परिणाम होणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी ७६ ग्रामसेवकांनी आपल्या कागदपत्रांच्या कपाटाच्या किल्ल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्याकडे सुपूर्त केल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात विकासकामे आणि आर्थिकतेवर याचा परिणाम होणार आहे. ७६ ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चार ग्रामपंचायतीत कंत्राटी ग्रामसेवक असल्याने ते संपावर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे डाळिंब, नाथाचीवाडी, पेडगाव, टेळेवाडी या ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत राहणार आहे. कंत्राटी सेवक म्हणून सुरुवातीला तीन वर्षे काम करणाऱ्या ग्रामसेवकांची सेवा त्यांच्या कालावधीत नियमित करावी, दरमहा पगारात ३ हजार रुपयांचा प्रवासभत्ता मिळावा, रोजगार हमी योजनेचे कामकाज स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावे, ग्रामसेवकांवर होणारे प्राणघातक हल्ले याबाबत ग्रामसेवकांना संरक्षण मिळावे, ग्रामसेवकांवर होणाऱ्या प्रशासकीय कारवाया थांबवाव्यात यांसह अन्य काही ग्रामसेवकांच्या मागण्या आहेत. त्यामुळे या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. अन्यथा यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.