मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाते जलसाठ्याची चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:23 AM2018-12-05T05:23:16+5:302018-12-05T05:23:22+5:30

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत.

Incorrect information regarding the maintenance of cabinet meetings | मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाते जलसाठ्याची चुकीची माहिती

मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाते जलसाठ्याची चुकीची माहिती

Next

- विशाल शिर्के 
पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. राज्यातील ४६ मोठ्या आणि १६० मध्यम अशा २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची माहिती अद्ययावत केली जात नसल्याने, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चुकीची माहिती सादर केली जात असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील धरणसाठ्यांची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने ‘प्रवाह’ नावाने अ‍ॅप तयार केला आहे. धरणसाठ्यांची माहिती भरण्यासाठी एक अधिकारीही आहे. त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन ही माहिती भरल्यास राज्य सरकारच्या संकेतस्थळावर विश्लेषणासह ती माहिती अद्ययावत होत असते. मात्र संबंधित अधिकारी ही माहिती अद्ययावत करीत नसल्याची बाब समोर आली आहे.
यासंदर्भात जलसंपदा विभागाने सर्व मुख्य अभियंत्याना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, धरण पाणीसाठ्याची माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत न केल्यास सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितास जबाबदार धरण्यात येईल. जलसाठ्याची माहिती अद्ययावत न केल्याने सरकारकडे चुकीची माहिती सादर होत असल्याचे जलसंपदा ई प्रशासन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी म्हटले आहे.
>दीड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटला
अकोला: वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील जलसाठा अवघ्या दीड महिन्यात १५ टक्के घटला असून, आता केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के साठा होता. नोव्हेंबर उजाडताच यामध्ये घट झाली असून, ३ डिसेंबरला एकूण ४८.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Web Title: Incorrect information regarding the maintenance of cabinet meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.