Corona Virus News: पुणे शहरात रविवारी १ हजार ७४० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 06:57 PM2021-03-14T18:57:08+5:302021-03-14T19:29:59+5:30
दिवसभरात ८५८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी
शहरातील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाहीये. त्याचप्रमाणे एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. रविवारी १ हजार ७४० रुग्णांची वाढ झाली आहे. तर बरे झालेल्या ८५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
विविध रुग्णालयातील ३५५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ११ हजार ५९० झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ७६५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये २ रुग्ण पुण्याबाहेरील आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९५२ झाली आहे.
दिवसभरात एकूण ८५८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १ हजार ६६१ झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ लाख १८ हजार २०३ आणि सक्रिय रूग्णांची संख्या ११ हजार ५९० झाली आहे. विविध केंद्रांवर एकूण ९ हजार १२२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ४८ हजार ३८६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.